BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन ,शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय

Summary

गडचिरोली / जिल्हा प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ८ एप्रिल २०२१: – गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील खमनचेरू ग्रा.प.अंतर्गत येत असलेल्या टेकुलगुळा येथे मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. सदर कामांसाठी गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय […]

गडचिरोली / जिल्हा प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ८ एप्रिल २०२१: – गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील खमनचेरू ग्रा.प.अंतर्गत येत असलेल्या टेकुलगुळा येथे मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. सदर कामांसाठी गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून निधी मंजूर करण्यात आले असून आज सदर तलावाच्या खोलीकरण कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
टेकुलगुळा येथील तलाव मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने गावातील शेतकऱ्यांना बिनउपयोगी ठरत होते. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिली होती. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत टेकुलगुळा येथील तलाव खोलीकरण कामासाठी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे टेकुलगुळा येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
तलाव खोलीकरण झाल्यास पाण्याची साठवणूक जास्त होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून पूरकपणे पीक घेण्यास सोईचे होईल.
भूमिपूजन सोहळा प्रसंगी जि. प.सदस्य कु.सुनीताताई कुसनाके यांच्या समवेत खमनचेरू ग्राम पंचायतचे सरपंच सायलू मडावी, उपसरपंच साईनाथ कुकुडकर ,जलसंधारण उपविभागीय अभियंता इंगोले, ग्रा.प.सदस्य जीवांकला आलाम, शमा बारसागडे, कलावती कोडापे, साक्षी डोंगरे, दीपक कुसनाके, खमनचेरु चे ग्रामसेविका संदया गेडाम, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *