डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सेवेकरी शिवराम जाधव यांचे निधन.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 17/ मे. 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सेवेकरी गड्डीगुड्डम (छावणी) येथील रहिवाशी शिवराम जाधव (वय 95) यांचे दीर्घ आजाराने आज (रविवार) निधन झाले.
*शिवराम जाधव आणि बाबासाहेब :* जाधव यांना मिलिंद महाविद्यालयात शिपाई पदावर काम करण्यासह बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली. बाबासाहेब छोट्यामोठ्या कामांसाठी शिवराम जाधव यांना हाका मारायचे. अगदी बाबासाहेबांचे जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवण्यापर्यंतचे काम जाधव यांनी केले. बाबासाहेबांच्या सहवासामुळेच जाधव यांची शेवटपर्यंत वेगळी ओळख होती. जावध यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्यावर छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवराम जाधव यांच्या निधनानंतर आंबेडकरी जनतेने त्यांना आदरांजली वाहिली.