डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा
नागपूर वार्ता: – देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कन्हान वृत्तपत्र विक्रेता व्दारे वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.
दिनाक १५ ऑक्टोंबर २०२० ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नगरपरिषद समोर हारगुडे बुक स्टाल येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला कन्हान वृत्तपत्र विक्रेता सुतेश मारबते, श्रीधर केशट्टीवार, एन एस मालविये, मोहीत वतेकर, दिगांबर हारगुडे हयानी पुष्पहार, पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी देशाकरिता व समाजाकरिता डॉ अब्दुल कलाम यांनी केलेल्या महान का र्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. दर रोज पहाटे सकाळी घरोघरी दैनिक वृत्त पत्र वितरण करण्या-या मुलांना नोटबुक व पेन वितरण करून सर्व वृत्तपत्र विक्रे तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुतेश मारबते यांनी तर आभार नरेश बिसने यानी व्यकत केले. याप्रसंगी चंद्रशेखर भिमटे, धंनजय कापसीकर, कैलास सोनी, दिनेश नानवटकर, विवेक पाटील, पुथ्वीराज वासे, योगेश बर्वे, राजेश गायधने, अकुंश उताणे, गोविंद मारबते, निलेश बर्वे आदी उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535