डॉक्टरांना,पोलीसांना राख्या बांधून विध्यार्थ्यानी केल्या कृतार्थ भावना व्यक्त
Summary
नागपूर ,करोना काळात डॉक्टरांनी देवदूत बनून रुग्णांची सेवा केली.प्रसंगी स्वताचा जीव धोक्यात घातला त्याचबरोबर करोना काळात लॉक डाउन चे नियम पाळन्यासाठी अहोरात्र झटनारे पोलीस,लोकांमधे जनजागृती व्हावी यासाठी सातत्याने झटनारे पत्रकार बंधू,जन आरोग्याची काळजी घेनारे सफाई कर्मचारी या सर्वाविषयी कृतार्थ भावना […]
नागपूर ,करोना काळात डॉक्टरांनी देवदूत बनून रुग्णांची सेवा केली.प्रसंगी स्वताचा जीव धोक्यात घातला त्याचबरोबर करोना काळात लॉक डाउन चे नियम पाळन्यासाठी अहोरात्र झटनारे पोलीस,लोकांमधे जनजागृती व्हावी यासाठी सातत्याने झटनारे पत्रकार बंधू,जन आरोग्याची काळजी घेनारे सफाई कर्मचारी या सर्वाविषयी कृतार्थ भावना व्यक्त करत श्री सत्यसाई विद्या मंदिर नरसाळा या शाळेतिल विद्यार्थ्यांनी राख्या बनवून शाळेत पाठवल्या आहेत.करोना काळात करोना योंदध्यावीषयी कृतार्थता व्यक्त करण्यासबंधी शाळेने राख्या पाठवा अभियान सुरु केले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.आतापर्यंत 600 हुन अधिक राख्या विद्यार्थ्यांनी शाळेत पाठवल्या आहेत.नरसाळा येथील महानगर पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी,फ़ार्मसिस्ट तसेच हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी यांना राख्या बांधून करोना काळात केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतार्थता व्यक्त करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक शाळेतील संचालक नरेंद्र ढवळे,सचिव डॉ.राजेंद्र वाटाणे,मुख्याध्यापक निलेश सोन्टक्के,शिक्षक सुष्मा चरपे,रंजना राऊत,अंकुश कडू,शितल राठोड़,प्रफुल देवतळे,करुणा कोल्हे,संजय खंडार,अर्चना मानकर,श्वेतल खंगार यांनी केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा नागपूर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद