सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा अर्जुनी मोर. येथे पालक शिक्षक सभा संपन्न
Summary
प्रतिनिधी, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यातील दिनांक १३ऑगष्ट २०२४रोजी सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव येथे पालक व शिक्षक सभा घघेण्यात आली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती, भुते मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सरस्वती विद्यालय तथा […]
प्रतिनिधी, भंडारा
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यातील
दिनांक १३ऑगष्ट २०२४रोजी सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव येथे पालक व शिक्षक सभा घघेण्यात आली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती, भुते मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जे. डी. पठाण सर होते. तसेच पालकांमधून कार्यकारणीची निवड करण्यात आली. सचिव म्हणून श्री मछिंद्र गोंडाने व सहसचिव म्हणून सौ. शितल ढोमणे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये वर्ग १ते ४ पर्यंतच्या पालकांमधून १ महिला व १ पुरुष असे एकूण २ सदस्यांची निवड करण्यात आली. सभेमध्ये पालक _ विधार्थी_ शिक्षक यामध्ये कसा समन्वय साधता यावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास कसा होईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद यांनी स्वतः विषयी माहिती देत वर्ग आणि विषय या संबंधी अवगत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वाय. एम. रोकडे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. पि. जी. बावनकुळे मॅडम व आभार प्रदर्शन कु. के. एम. उके मॅडम यांनी केले.