BREAKING NEWS:
ठाणे महाराष्ट्र हेडलाइन

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

Summary

ठाणे, दि. १९ (जिमाका)   ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे […]

ठाणे, दि. १९ (जिमाका)   ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे –

23-भिवंडी लोकसभा मतदारसंघ – एकूण मतदार – 2087604 (पुरुष मतदार-1129714, महिला मतदार-957191, तृतीय पंथी मतदार-339, सेवा मतदार-360).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

134-भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68).

135-शहापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39).

136-भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16)

137-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14)

138-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140).

139-मुरबाड विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83).

24-कल्याण लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).

141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 257477 (पुरुष मतदार-139848, महिला मतदार-117422, तृतीय पंथी मतदार- 97, सेवा मतदार-110).

142-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 299518 (पुरुष मतदार-159289, महिला मतदार-139684, तृतीय पंथी मतदार- 407, सेवा मतदार-138).

143-डोंबीवली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 275172 (पुरुष मतदार-143196, महिला मतदार-131914, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-62).

144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 453221 (पुरुष मतदार-248124, महिला मतदार-204902, तृतीय पंथी मतदार- 123, सेवा मतदार-72)

149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443751 (पुरुष मतदार-237113, महिला मतदार-206445, तृतीय पंथी मतदार- 103, सेवा मतदार-90).

25 – ठाणे लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2508072 (पुरुष मतदार-1348163, महिला मतदार-1159002, तृतीय पंथी मतदार-207, सेवा मतदार-700).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

145- मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार  – 457391 (पुरुष मतदार-242966, महिला मतदार-214389, तृतीय पंथी मतदार- 4, सेवा मतदार-32)

146-ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 509346  (पुरुष मतदार-273272, महिला मतदार-235928, तृतीय पंथी मतदार- 27, सेवा मतदार-119).

147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 328185 (पुरुष मतदार-175561, महिला मतदार-152472, तृतीय पंथी मतदार- 21, सेवा मतदार-131)

148-ठाणे विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 357684 (पुरुष मतदार-185857, महिला मतदार-171681, तृतीय पंथी मतदार- 7, सेवा मतदार-139).

150-ऐरोली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 457611 (पुरुष मतदार-257611, महिला मतदार-199715, तृतीय पंथी मतदार- 130, सेवा मतदार-155).

151- बेलापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 397855 (पुरुष मतदार-212896, महिला मतदार-184817, तृतीय पंथी मतदार- 18, सेवा मतदार-124).

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *