BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Summary

मुंबई, दि. 7 :- “ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार  यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न […]

मुंबई, दि. 7 :- “ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार  यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *