BREAKING NEWS:
अकोला महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण ई-सेवेचा लाभ घेण्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन

Summary

अकोला,दि.22(जिमाका)- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वकील व पक्षकारांनी ई-सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती […]

अकोला,दि.22(जिमाका)- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वकील व पक्षकारांनी ई-सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

 

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख  जिल्हा व सत्र न्यायाधीश  यनशिवराज  खोब्रागडे, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य ॲड. मो.घ. मोहता, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप  पतंगे, न्यायीक अधिकारी व विधिज्ञ आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना पालक न्यायमूर्ती अनिल किलोर  म्हणाले की, न्यायदानाचे काम हे सामाजिक सेवा असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळाला पाहिजे. ई-सेवा प्रणालीव्दारे न्यायालयीन कामकाज अधिक सोपे व सोईस्कर होणार आहे. या प्रणालीचा लाभ वकील व पक्षाकारांनी घेवून वेळ व पैसाची बचत करावी. ई-सेवा केंद्राचा सर्वसामान्य नागरिकांपर्यत जनजागृती करावी. न्यायालयीन प्रक्रीया अधिक पारदर्शक व वेगवान होण्याकरीता न्यायधीस, वकील, पक्षकार व न्यायालयातील कर्मचारी यांनी सामूहिक सहकार्याने कामे करावे. जिल्ह्यातील केसची पेडन्सी कमी करण्यासाठी न्यायाधीसासह वकीलांनी प्रयत्न करण्याचे आवाहन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

 

कार्यक्रमाचे सुत्र संचालन जी.के. खाडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप  पतंगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *