BREAKING NEWS:
हेडलाइन

चंद्रपूर जिल्हाचे तापमान बघता जिल्हातील शाळेची वेळ सकाळी 11:30 पर्यंत करण्यात यावे- प्रहार शिक्षक संघटना

Summary

प्रेसनोट     चंद्रपूर जिल्हाचे तापमान बघता जिल्हातील शाळेची वेळ सकाळी 11:30 पर्यंत करण्यात यावे- प्रहार शिक्षक संघटना राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने ,पूर्णवेळ घेणे शासनाने 24 मार्च 2022 च्या शासन परिपत्रक काढून निर्धारित केलेली आहे . त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद […]

प्रेसनोट

 

 

चंद्रपूर जिल्हाचे तापमान बघता जिल्हातील शाळेची वेळ सकाळी 11:30 पर्यंत करण्यात यावे- प्रहार शिक्षक संघटना

राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने ,पूर्णवेळ घेणे शासनाने 24 मार्च 2022 च्या शासन परिपत्रक काढून निर्धारित केलेली आहे . त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूर च्या शिक्षण समितीने जिल्ह्यातील शाळा सकाळी सात ते एक वाजेपर्यंत पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेळ घेण्यात यावे असे निर्णय शिक्षण समितीत घेतल्यामुळे , त्या ठरावाची अमलबजावणी व्हावी या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परीषद चंद्रपूर यांनी जिहातील 1ते 9 व 11 वी चे वर्ग सकाळी 7 ते दुपारी 1:०० वाजेपर्यंत घेण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान जगात तीन नंबर वर असते. मार्च महिन्यापासूनच जील्हातीत उष्णतेचा पारा वाढलेला असून एप्रिल महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. या तापमानामध्ये माणसे आणि पशुपक्षी यांनासुद्धा हे वातावरण अत्यंत धोकादायक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काही विद्यार्थी बाहेरगावाहून येतात त्यांना उष्णतेची झळ पोहोचू शकते .प्रचंड उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका पोहोचू शकतो. त्यामुळे 30 मार्च 2022 च्या परिपत्रकात

जिल्ह्यातील शाळा सकाळी 7-00 ते 11.30 वाजेपर्यंत वाजेपर्यंत ठेवण्यात याव्यात. अशी मागणी प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी , जिल्हा परीषद चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्दारे करण्यातआलेली आहे.त्या निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ना.बछु भाउ कडू,शिक्षणाधिकारी (प्राथ/मध्या) यांना देण्यातआलेलीअसून. जिल्हा परिषद प्रशासनाने जील्हातील तापमानाचा विचार करून, शाळेची वेळ सकाळी 7 ते 11:३० करिता आपल्याकडे करण्यात यावी.अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे , जिल्हा सरचिटणीस, विनोद लंडगे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपूरे यांनी केली आहे.

मा. जिल्हा प्रतिनिधी, दैनिक , कृपया हि बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करावी. ही विनंती. आपला jaydas sangode

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *