गोंडेगाव ला रक्तदान व पारशिवनी येथे मोदी सरकार विरूध्द घोषणेने ‘संकल्प दिवस ‘ साजरा

कन्हान : – कॉग्रेस पक्ष माजी अध्यक्ष व खासदार मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवस रामटेक विधानसभा युवक काँग्रेस आणि पारशिवनी तालुका युवक काँग्रेस व्दारे गोंडेगाव येथे रक्तदान शिबीर व पारशिवनी येथे बेरोजगारी हटविण्याकरिता मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करून ‘ संकल्प दिवस ‘ साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.१९) जुन २०२१ ला भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस माजी अध्यक्ष व खासदार मा राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिवस’ म्हणुन रामटेक विधानसभा युवक काँग्रेस आणि पारशिवनी तालुका युवक काँग्रेस व्दारे रामटेक विधान सभेतील गोंडेगाव येथे रक्तदान शिबीरात युवकांनी रक्तदान करून पारशिवनी तालुका स्थळी परिसरातील बेरोजगारी हटविण्यात येऊन युवकांना रोजगार उपलब्ध करण्यास अपयशी मोदी सरकार विरोधी घोषणा बाजी करून स्थानिक युवकां ना त्याच्या परिसरातच रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प करून मा राहुल गांधी यांचा वाढदिवस ़थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपुर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव उदयसिंह उर्फ गज्जु यादव, पारशिवनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दयारामजी भोयर, पं स पारशिवनी सभापती सौ.मिनाताई कावळे , उपसभापती चेतन देशमुख, बबनराव झाडे, शिवकु मार यादव, साबीर सिद्दीकी, दिपक भोयर, सिताराम पटेल भारद्वाज, देविदास जामदार, वराडा सरपंचा सौ. विद्याताई चिखले, उमराव निंबोने, दिपक वर्मा, प्रेमचंद कुंसुबे, प्रवीण शेलारे, इंद्रपाल गोरले, जिवलग चव्हाण पुरुषोत्तम जौंजाळ, मोरेश्वर शिंगणे, कुणाल मधुमटके, ललिता पहाडे, व्यंकटजी काळे, प्रकाश हुकूम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरि ता रामटेक विधानसभा युवक काँग्रेस ़अध्यक्ष निखिल दा. पाटील, कार्याध्यक्ष कुशल पोटभरे, महासचिव गौरव भोयर, अनिकेत निंबोन, सारंग काळे, रोशन नाखले, महेश धोगडे, निखिल हिवसे, सचिन फलके, गणेश हिवसे, हितेश भोयर, सतीश लक्षणे, सुधीर काठोके, कुणाल नाईक, सुमित गजभिये, शुभम शिंग णे, खुश नाईक, राहुल कोल्हे, स्वप्नदीप वाळनकर, प्रविण जगताप, रोहित रंगारी, कमलेश गजभिये, अमित गजभिये, सतीश लक्षणे, सतीश लक्षणे, विनय पाली, अनिल डोकरीमारे, स्वप्निल बोढारे, प्रितम राऊत, आयुष भडंग, अनिकेत मुरकुटे, दिपक शिंगणे, राजु शिंगणे, श्याम शिंगणे, हर्ष खाडे, अमर काळे, मयूर निकोसे, ललित नाईक, उदय नाईक, विकी धरणे, गौरव गजभिये, रितिक गजभिये, अजय पाटील आदीने उपस्थित राहुन सहकार्य केले.