गडचिरोली जिल्ह्यात 506 कोरोनामुक्त 12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली :- चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी,
दि.13 मे : आज जिल्हयात 266 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 506 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 54 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील 68 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 47 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 45 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 266 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 15, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 54, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 15, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 21 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 506 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 172, अहेरी 56, आरमोरी 29, भामरागड 7, चामोर्शी 41, धानोरा 26, एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 19, कोरची 9, कुरखेडा 31 तसेच वडसा येथील 58 जणांचा समावेश आहे.