गडचिरोली जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा गोरखधंदा?? अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगावी. वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न?? तोतयांकडून प्राणघातक हल्ले?

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 2 जुन 2021
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पत्रकारितेच्या नावावर तोतया पत्रकारांनी गोरख धंदा सुरू केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात तोतया पत्रकारितेला अतिशय उधाण आलेले असून जो तो स्वतःला पत्रकार सांगून समाजात लोकांपुढे व इतर शासकीय अधिकाऱ्या पुढे स्वतःची शेखी मिरवताना दिसत असतात. जिल्ह्यातील हे तो त ये पत्रकार कुठल्यातरी साप्ताहिकांचे किंवा दैनिकांचे आम्ही प्रतिनिधी आहोत. व आपापल्या नावाने त्या त्या साप्ताहिकाचे व दैनिकाची खोटे, जाली ओळखपत्र तयार करून खऱ्या पत्रकारा पेक्षा तोतया पत्रकारांचा जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात शिरकाव होताना दिसतो .खऱ्या पत्रकारांना ज्या गोष्टीची जाणीव नसते हे तोतया पत्रकार स्वतःचे व्यक्तिमत्व व दमदार भाषाशैली अवगत करून शासकीय अधिकारी यांच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. पत्रकारितेच्या नावावर या तोतया पत्रकारांनी अनेक गोरख धंदे सुरू केलेले असून या गोरख धंद्याच्या माध्यमातून अमाप पैसा कमविताना दिसत आहेत . वेळ प्रसंगी वृत्तपत्रात काम करणाऱ्या चारित्र्यशील पत्रकारांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वृत्त संकलनासाठी बाहेर पडून या तोतया पत्रकारांचा करीत असलेल्या तस्करीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला तर हे तोतया पत्रकार वृत्तपत्राच्या खऱ्या प्रतिनिधी वर प्राणघातक हल्ले करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असतात उलट पोलिसांशी व संबंधित ठाणेदार यांचेशी हितसंबंध साधून वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांच्या नावाने उलट पोलिस स्टेशनला खोटी तक्रार देऊन त्यांच्यावर खंडणी वसूल आरोपात अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तोतया पत्रकारांकडून अनेक प्राणघातक हल्ले होताना दिसत आहेत . ही गंभीर बाब प्रशासन यांच्या निदर्शनात येत असताना सुद्धा तस्करांशी हितसबंध प्रस्तापित करून व आपले हाथ पिवडे करून तोतया तस्करांना समर्थन देण्याचे काम करीत आहेत तोतयांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करून खुलेआम तस्करीचे अनेक धंदे सुरू केले असून लुटमार केली जाते. तोतयांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे तोतया तस्करांची हिम्मत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशी माहिती मे. अनुप यांनी दिली आहे.