क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी
Summary
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 10, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सिल्लोड येथील महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी नगरसेवक विठ्ठल सपकाळ यांच्याहस्ते […]

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 10,
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सिल्लोड येथील महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी नगरसेवक विठ्ठल सपकाळ यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाईं पवार, नगरसेवक सुनिल दुधे,राजेंद्र बन्सोड, संजय मुरकुटे, संतोष खैरनार, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे,शेख इम्रान, सुशिल गोसावी, संतोष धाडगे, शेख शमीम, गणेश डकले,सुभाष जाधव, रवि पवार, रामदास दुधे, कैलास दुधे, गणेश शेलार, देविदास शिंदे, आदिंसह कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
प्रतिनिधी
शेख चांद