BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कोरोना काळातील सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Summary

मुंबई, दि. 30 : समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते […]

मुंबई, दि. 30 : समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझन्स प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला पोलीस महासंचालक व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे सिटिझनस फोरमचे अध्यक्ष कॅस्बेर ऑगस्टीन व जेव्हीएम धर्मादाय फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मेहता उपस्थित होते.

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व कोरोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापर, सुरक्षित अंतर राखणे आदी कोरोनाविषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालक विवेक फणसळकर, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, एस डी ओ अविनाश शिंदे, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ कैलाश पवार, तहसिलदार अधिक पाटील, मनोरुग्णालयचे अधिक्षक डॉ संजय बोदडे, सर्कल अधिकारी संजय पतंगे, तलाठी आरती नितीन यशवंतराव, परिचारिका वर्षा दळवी, सारिका ढोकले, ठाणे पोलीस दलातील जहांगीर चोहारी, वॉर्डबॉय विक्की धाकोलिया, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमचे वैद्यकिय अधिकारी डॉ वैजयंती देवगेकर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधव, उपजिल्हाधिकारी वर्षा दिक्षीत, ठाणे महानगरपालिकेचे गिरीश झलके, डॉ प्रेषिता क्षीरसागर, डॉ अनिता कापडणे, वैद्यकिय अधिकारी डॉ मिलींद उबाळे, डॉ योगिता धायगुडे, डॉ खुशबू टावरी, डॉ अदिती कदम,  डॉ ए ए माळगावकर, डॉ प्रज्ञा जाधव, डॉ जयेश पानोत, डॉ स्मिताली हमरूस्कर, डॉ अयाझ शेख, अधर कुलकर्णी,  डॉ समिधा गोरे, दिलीप सुरेश महाले, ठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळ, सिस्टर मंगल पवार, फादर बापटीस्ट विगास, बेथानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी स्टीफन, डॉ संतोष कदम, डॉ अंकित ठक्कर, डॉ संदीप कदम, डॉ रहीश रवीन्द्रन, डॉ मुकेश उदानी, आदींना ठाणे सिटीझन्स प्राईज ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *