कु. भारती प. गजभिये हीने सावित्री जोतीराव फुले वरती कविता केली सादर
श्री निकेतनं आर्टस् कॉलेज, नाग पुर
श्री निकेतन आर्टस् कॉलेज नागपूर येथील बी. कॉम. प्रथम सत्र इंग्लिश ची कु. भारती प. गजभिये हीने सावित्री जोतीराव फुले वरती कविता सादर केलेली आहे माझी सावित्री
पहाटेच्या अंधाराला सूर्याची साथसाथ तशीच लाभली जोतिबा सावित्रीची साथ
तिने जाणली गोरगरिबांची मुकभाषा
मागास्वर्गीयात पुन्हा जागली जीवनाची आशा
सावित्रीला जोतिबांनी ज्ञान वर्तित केले
अशा या दिव्य स्त्रीने भारत ज्ञानवरतीत केला
स्वतःचा नाही तिला भास काही
चिखलदगड सहन केले सर्वकाही
भीती नाही तिला कशाचीही दिवस असो वा रात्र
अशी कुणाच्याही बापाला न घाबरणारी होती सावित्री
तुझ्यामुळे आज मुली जगात नाव मिळवत आहे अशीच वेळ आठव की तुलालोक धर्म बाटवणारी म्हणत
तुझ्याचमुळे आज मुली प्रत्येक छे त्रात प्रगतीवर आहेत
तसेच अनमोल उपकार आमहा स्त्रियांवर आहेत
स्त्री जातीवरच्या उपकाराचे रून फेडू शकणार नाही
या कष्टाचे मोल विसरू शकणार नाही
या भारतभूमीवर पसरली शेती दरिद्री
गोरगरिबांची वाली बनून जन्म घेतला सावित्री
काळोखालाही लाज वाटेल अशी सूर्याची तेज होती
पंखानाही आपलं करण्याची कला तिला अवगत होती
जीवनावश्यक पाण्यासाठी विशिष्ट दान ज्योतिसावीत्रीने केले
काशीबाई यशवंतालाही जीवनदान त्या माऊलीने दिले
पहिल्या स्त्री शिक्षिके चा तूच मिळविला मान
आई सावित्री तूच खरा स्त्री जातीचा सन्मान
दिलीप भुयार
प्रतिनिधी प. नागपूर
9503309676