कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील घटना

प्रतिनिधी, भंडारा
लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील अंगावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने आर्थिक विवंचनेत एका शेतकऱ्याने घरीच नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे
दि. १९जुलै २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनिल आसाराम चव्हारे (५०) रा. पारडी असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्याचेवर सेवा सहकारी सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते. दिघोरी मोठी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सद्या रोवनिचा हंगाम जोमात सुरू असून मृतकाचे आई व लहान भाऊ हे शेतात रोवनी करायला गेले होते. रोवणी सुरू असतांना मृतक घरी आला. कर्जामुळे मृतक काही दिवसांपासून मानसिक तनावात वावरत असल्याचे घरच्यांनी सांगितले. घटनेच्या दिवसी घरी एकटा असल्याची संधी साधून त्यांनी स्वताच्या घरातील माजघरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मृतकाचा मुलगा गोपाल अनिल चव्हारे यांनी दिघोरी मोठी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धंदर यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पो. हवा. कोडापे यांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.