आर्णी येथील विविध समस्या निकाली काढणार : – खासदार बाळू धानोरकर
आर्णी : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांचा लाभ, लोकाभिमुख सेवा व विकासकामांना गती द्यावी अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी शासकीय विश्रामगृह आर्णी येथे केल्या.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे, अरिफ बेग, सुनील भरती, अनिल आडे, विजय मोघे, बाळा साहेब शिंदे, विकास पाटील, राजू विरखेडे, छोटू देशमुख, प्रदीप वानखेडे, विकास आगळघरे, अन्वर पठाण यांची उपस्थिती होती.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आरोग्य विभाग याकडे जातीने लक्ष घालीत आहेत. या विषयावर खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतः आढावा घेतला. त्याच प्रमाणे आर्णी येथील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या एकूण त्या त्वरित निकाली काढण्यात येतील असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर