आई_रमाई तुला, तुझ्या स्वाभिमानाला, तुझ्या त्यागाला, कष्टाला अभिवादन । आयुष्यभर तू आमच्या बापासाठी आणि आमच्यासाठी तुझ्या रक्ताच पाणी केलंस,

आई_रमाई तुला, तुझ्या स्वाभिमानाला, तुझ्या त्यागाला, कष्टाला अभिवादन ।
आयुष्यभर तू आमच्या बापासाठी आणि आमच्यासाठी तुझ्या रक्ताच पाणी केलंस,
तुझ्या लेकरांना जगवण्याच्या भयावह संघर्षात तुझी चार लेकरं अन्न पाण्याविना, औषधाविना गेली असली तरी,
आज आमचं एकही पोरगं आता कधीच अन्नपाण्याविना आणि औषधाविना जाणार नाही अश्या भक्कम व्यवस्थेची तू खरीखुरी जननी आहेस.
तुला त्याकाळचा अतिशय दुर्धर असा टीबी चा आजार झाला असतांना देखील तुझ्या आजारापेक्षा महाभयानक आजार आपल्या समाजाला झाला, आणि त्याचा एकमेव डॉक्टर बा भीमा असल्यामुळे तुला सुद्धा त्यांनी समाजासाठी कुर्बान केले.
तुझ्या अथक काबाडकष्टाला, त्यागाला अभिवादन, सलाम आणि अशे कित्येक शब्द सुद्धा फिके पडलेत.
इतकंच काय तर आमच्या सगळ्यांच्या आयांना सुद्धा तुझ्या मायेची आणि त्यागाची सर कधीच येणार नाही.
बा भीमा आणि तुझ्याच मुळे आमच्या पिढ्या स्वाभिमानाने जगत आहेत, स्वातंत्र उपभोगत आहेत त्यापलीकडे जाऊन त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माज चढलाय !
कष्टाची किमंत त्यांना कळेनाशी झालीये,
ते तुझ्या त्यागाला विसरलेत आणि त्याहूनही कहर म्हणजे जातिवाद्यांच्या आयांना आणि बापाला स्वतःचे मायबाप मानून ते थेट शत्रूच्या गोटात जाऊन बसलेत !
आज परिस्थिती अशी आहे की शत्रूच्या लाथा खाऊन पण तिथेच कायम राहण्याची शपथ खाऊनच ते निघालेत.
तू आणि बा भिमानी सांगितलेला स्वाभिमान आमच्या लोकांनी विकून खाल्लाय !
पण आई आम्ही तुला अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगतो की आम्ही सुद्धा स्वस्थ बसलेलो नाही आणि बसणार नाहीच
आणि अश्या बेईमान लोकांना धडा शिकवल्या शिवाय सुद्धा राहणार नाही.
तुझ्या कष्टाची, स्वाभिमानाची, त्यागाची जाण आम्हाला आहे आणि तुझा हा वारसा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देऊच आणि पुन्हा एकदा जिजाऊ, साऊ आणि रमाई आमच्या पिढ्यांपिढ्यात ताकदीने, अभिमानाने आणि स्वाभिमानाने नेऊ !
तेच तुला खरे अभिवादन असेल।
– महेंद्र अशोक पंडागळे
07678044677
जयभीम जयभारत ।