महाराष्ट्र हेडलाइन

अपघातातील अधिपरिचारिका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू. – सोनापूर फाट्याजवळ पोलीस वाहनाने झाला होता अपघात . – कोरोना सेंटरमध्ये करित होती ड्युटी. शासन गंभीरतेने दखल घेऊन परिवारास आर्थिक मदत करणार??

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २९ मे. २०२१ गडचिरोली ते आष्टी मार्गावर पोलिस वाहनाने 26 मे रोजी दुचाकी वाहनाला धडक दिल्याने या अपघातात अधिपरिचारिका सुषमा दुर्गे ही महीला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २९ मे. २०२१
गडचिरोली ते आष्टी मार्गावर पोलिस वाहनाने 26 मे रोजी दुचाकी वाहनाला धडक दिल्याने या अपघातात अधिपरिचारिका सुषमा दुर्गे ही महीला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते. परंतु पोलीस वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेवटी उपचारा दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुषमा या अधिपरिचारिका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे सोनापुर, आष्टी व सावली परिसरात फार शोककळा पसरली आहे.
गडचिरोलीवरून अहेरीकडे जाणारे अहेरी प्राणहिताच्या पोलिस वाहनाने सोनापूर येथील आरोग्य उपकेंद्रात अधिपरिचारिका पदावर कार्यरत असलेल्या सुषमा दुर्गे या कर्तव्यावर जात असतांना त्यांच्या दुचाकीला 26 मे रोजी सोनापूर फाट्याजवळ जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. प्रारंभी उपचारा नंतरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 27 मे च्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीसुद्धा सोनापूर फाट्याजवळ अनेकदा अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. असे असतांनाही येथे गतिरोधक उभारण्यात आलेले नाही. इथेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बेशरम पणा सिद्ध होत आहे.भविष्यात अपघात रोखण्यासाठी येथे गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे. ही अतिशय दु:खद घटना घडली असून यासाठी प्रशासकीय अधिकारी , पोलीस वाहन चालक, आणि बेजबाबदार,, बेशरम जनतेच्या समस्या कडे दुर्लक्ष करणारे राजकीय नेते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. हे नाकारता येणार नाही..
सुषमा दुर्गे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सोनापूर प्राथ.आरोग्य केंद्र आमगाव म. कोविड 19 लसीकरण ड्युटीवर जात असतांना अपघात झाला . दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले . दुर्गे परिवारास दु:खातून सावरण्यास शक्ती देवो अशी ग्राम पंचायत सोनापूर आणि ग्रामवासियां कडून एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. अनेक वर्षांपासून सोनापूर वासीय सर्वांचे आरोग्याची काळजी घेणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या, गावं विकासाला योगदान दिलेल्या, सोनापुर येथील कु. एस. के. दुर्गे (सिस्टर)CNM या गावातील एक कर्मचारी अशा एकाकी जाण्यानं संपूर्ण सोनापूर गावावर शोककळा पसरली आहे, त्यामुळे दिनांक 28/05/2021 ला शासकीय दुखवटा जाहीर करून सर्व गावातील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. . ग्राम पंचायत सोनापूर अंतर्गत शासकीय आरोग्य विभागात कर्त्यव्य बजावताना मृत्यू झाल्यास सबंधित कर्मचारी यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावे अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटना यांनी केली .या परिवारास क्षेत्रात काम करणारे आ. होळी योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम ठरणार आहेत का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, सुपरिचित, सोनापूर वासीय जनतेच्या हाकेला प्रतिसाद देत आरोग्य सेवा देणाऱ्या, सर्वांना समजून घेऊन तण-मनाने काम करणाऱ्या कु. सुषमा दुर्गे(पाटिल) CNM सिस्टर सोनापूर, यांचे दिनांक 26 मे ला सोनापूर जवळ चामोर्शी मार्गावर जड वाहनाने अपघात झाला .अपघातात गंभीर जखमी झाल्याने, नागपूर, येथे दुःखद निधन झाले। त्यांच्या अशा अचानक जान्याने, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे .यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले की, गावाला दिलेली सेवा, योगदान, कायम स्मरणात राहील .त्यांच्या परिवारास, या दुःखातून सावरण्याचा धैर्य मिळो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केल्या.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा त्यांच्या दुःखात सहभागी आहे अश्या शब्दात आरोग्य विभागातील हजारो कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणतेही कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावा, तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचारी डॉक्टर , नर्स , तथा रुग्णालयातील सफाई कर्मचारी यांचे आरोग्य विभागाच्या वतीने पन्नास लाख रुपयांचा विमा कवच देण्यात यावे अशी मागणी नसेऀस संघटनेच्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि शासन किती गंभीरपणे असे प्रकरण निकाली लावते. याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *