अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ…. हिंदू धर्मावरच टीकेचा रोख का? अन्य धर्मातील अंधश्रद्धा तुम्ही का वगळता?

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.२८ मे.२०२१:-
एखाद्या विषयाचा मूळ हेतू बाजूला ठेवून त्याला विपर्यस्त वळण देण्याचा कसा प्रयत्न होतो, याचा हा प्रश्न म्हणजे नमुनेदार उदाहरण आहे.
एखाद्या धर्मातील अंधश्रद्धांवर हेतुत: टीका करावयाची असा हेतू अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचा कधी नव्हता आणि नाही. अंधश्रद्धेच्या नावाने ज्या-ज्या ठिकाणी दिशाभूल , फसवणूक, शोषण, क्रूरपणा, अमानुषपणा असेल त्या – त्या ठिकाणी आपल्या कुवतीनुसार चळवळीने सतत आवाज उठिवला आहे.
करमअलीच्या दर्ग्यावरील तथाकथित चमत्कार, मीरावलीबाबाच्या दर्ग्यावरील भूत उतरविण्यासाठी साखळदंडाने बांधून झोडपणे, कटगुणच्या पीराजवळचा विष उतरविण्यासाठी मोहरमला दिला जाणारा मंत्र, नांदेड जिल्ह्यात अंगात येशू ख्रिस्त येणारा बाबा, बोहरा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर धर्मगुरूंनी घातलेली अमानुष बंधने अशी एक ना दोन अनेक उदाहरणे सांगता येतील. कारण मुद्दा अंधश्रद्धांचा आहे; धर्माचा नाही. तरीही काही बाबी लक्षात घ्यावयास हव्यात.
हिंदू धर्म हा जन्मतः लाभत असल्याने या देशातील ८०% लोक परंपरेने हिंदूच आहेत. स्वाभाविक चळवळीकडे येणाऱ्या प्रत्येक दहापकै ८ प्रकरणे ही हिंदूंची असणे स्वाभाविक आहे.
चळवळीतील कार्यकर्तेही स्वाभाविकच प्रामुख्याने हिंदूच असणार. आपल्या देशातील परस्पर धर्माच्या टीकेबाबत असलेली अनुदारता लक्षात घेतली, तर मुस्लीम वा अन्य धर्मियांनी हिंदू धर्मावर टीका केलेली आपल्याला अजिबात रुचत नाही ही वस्तुस्थिती आहे. (हिंदुत तर एका जातीने दुसऱ्या जातीचे दोष दाखिवले.उदा. महारांनी मराठ्यांचे, धनगरांनी ब्राह्मणांचे तरी रुचत-पचत नाही.) हीच गोष्ट इतर धर्मीयांबाबत खरी आहे. त्यामुळे काहीशी अपरिहार्यता म्हणनू स्वधर्मीय टीका मान्य व सहन केली पाहिजे.
बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम हे धर्म अलीकडच्या २ ते २ ।। हजार वर्षांतील आहेत. हिंदू धर्माच्या निर्मिती कालाबद्दल विवीध मते असली, तरी तो या धर्मापेक्षा २ ते २ ।। हजार वर्षांनी नक्कीच जुना आहे. देवांची संख्याही फार प्रचंड आहे. (बाकीचे प्रमुख धर्म एकेश्वरवादी आहेत.) यामुळे, व पुराणे हिंदू धर्मात भरपूर आहेत त्यांच्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होण्यास सुपीक भूमी तयार होते. याच बरोबर दुसऱ्या बाजसू *हिंदू समाजाला कठोर चिकेत्सेची अशी परंपरा आहे. प्राचीन काळात चार्वाक, लोकायत, बुद्ध, अर्वाचीन काळात महात्मा फुले, लोकिहतवादी, आगरकर, आंबेडकर, सावरकर, गाडगेबाबा यांच्या विचारांमुले अंधश्रद्धेवर आसूड ओढण्याचे काम हे चालत आलेले आहे. (इस्लाममध्ये तर ते आताशी कुठे चालू होत आहे.ते काम जसे वाढेल, त्या वेळी त्या धर्माचीही अधिक परखड समीक्षा होईल.) सगळ्यांत महत्वाचे म्हणजे धर्माच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आधारावर असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम समाजाला हितकारक आहे कि अहितकारक? हितकारक असेल तर ते आमच्याच धर्माबद्दल का करता अशा तक्रारी कशाकरीता? अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे काम हे थंडीत झोपलेल्या माणसाच्या अंगावरचे पांघरुण ओढण्याचे काम नसनू अंधारात त्याच्या उशाशी दिवा ठेवण्याचे काम आहे. खरे तर सर्वच भारतीयांसाठी ते व्हावयास हवे. (आमची तशी इच्छा असनू आम्ही तसे करतोही.) परंतु तरीही ज्यांना ते फक्त आपल्याच हिंदू धर्माबद्दल आहे असे वाटते, त्यांना ते हितकारक वाटते कि अहितकारक?
( डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार)