लस पूर्णपणे सुरक्षित, मी घेतली तुम्ही पण घ्या – युवानेते अब्दुल समीर नगराध्यक्षा, नगरसेवक व व्यापाऱ्यांनी ही घेतली कोरोना लस
सिल्लोड ( शेख चांद प्रतिनिधी ) दि.31,
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण एकमेव उपाय आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले असून मतदारसंघासह शहरात दि.2 सप्टेंबर पासून विषेश लसीकरण मोहीम सुरू होत आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आवाहनाला साद देत आम्ही आज कोरोना लस घेतली. कोरोना लस सुरक्षित असून मी लस घेतली आपणही कोरोना लस घ्या असे आवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.
युवानेते अब्दुल समीर यांच्यासह नगराध्यक्षा, नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ( दि.30 ) रोजी शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना लस घेतली. यावेळी अब्दुल समीर बोलत होते. श्री. समीर यांच्यासह नॅशनल सूत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, नगराध्यक्षा राजश्री निकम, नगरसेविका कल्याणीताई गौर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, मेघा शाह , न.प.गटनेते नंदकिशोर सहारे , मार्केट कमिटीचे संचालक सतीश ताठे, खरेदी विक्री संघाचे हनीफ मुलतानी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल,शेख अय्यूब , नगरसेवक सुधाकर पाटील, जितू आरके, मतीन देशमुख, जुम्मा खा पठाण, शेख बाबर,रईस मुजावर,मोहसिन पठान,मोइन खान,आरिफ पठान, अकिल देशमुख, राजू गौर, शिवा टोंपे ,फहीम पठान,नाना भवर, आशिष कटारिया, रामदास गोराडे,अशोक पालोदे, सागर काळे,अमोल कुदळ, शाहरुख खान, विलास काथार, फारूक पठाण, गजानन बर्डे आदिंनी कोरोनाची लस घेतली.