▪ माननीय दशरथजी जाधव यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड▪ ▪ आरोग्य, शैक्षणिक व रोजगाराच्या सुविधा प्रबळ करण्याचा प्रयत्न राहणार▪ ▪ आरोग्य विषयक सुविधा ना प्रथम प्राधान्य ▪ ▪आर्वीला अभियांत्रिकी महाविद्यालय व्हाव यासाठी प्रयत्नशील राहील ▪ ▪ 12 जुलै पासून तर 24 जुलै पर्यंत शिव संपर्क मोहीम राबविणार ▪
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंतराव गुढे, वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत जी शहागडकर, अनिल देवतारे यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड केली. त्यांचा मी आभारी असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आर्वी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी याला माझे प्रथम प्राधान्य राहील इतर पक्षाच्या माध्यमातून रुग्णवाहिका आदींची सुविधा करून देण्यात आली आहे. मात्र आमचं लक्ष याकडे असेल की नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज पडू नये तत्पूर्वी त्यांना उपचार मिळावा याकरिता आमचा प्रयत्न राहील पर्यावरणाचे संतुलन राखण शिवाय स्वच्छतेकडे आमचं बारीक लक्ष राहील.
विधानसभा क्षेत्रात तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे याच्या जोडीला अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावी अशी आमची मागणी आहे याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सावंत यांना वर्धा येथील बैठकीत निवेदन देण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता आमचे प्रयत्न राहील. शिवसेनेच्यावतीने 12 जुलै पासून तर 24 जुलै पर्यंत शिव संपर्क मोहीम राबविला जाणार आहे या दरम्यान पंचायत समिती गण व वाढणे हा बैठका आयोजित करण्यात येणार आहे त्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असून त्या सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत.
कोरूना च्या संकट काळात दिसून आलेल्या तृतिया दूर करून विधानसभा क्षेत्रातील आरोग्यविषयक सुविधा याशिवाय शैक्षणिक व रोजगाराच्या सुविधा प्रबळ करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव यांनी येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
▪पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪73 78 70 34 72 ▪