BREAKING NEWS:
वर्धा

▪ ज्योतिष्य, किती ? खरे ▪ ▪ किती ? खोटे▪ ▪ज्योतिष्य, किती शास्त्रीय ▪ ▪ किती अशास्त्रीय▪ ▪ ज्योतिष्य वैज्ञानिक की ▪ ▪ अवैज्ञानिक ▪ ▪ जगभरातील अनेक खगोल शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी ज्योतिषविद्या नाकारली आहे▪ ▪ ज्याला आधुनिक विज्ञान मान्यता देत नाही▪ ▪ मग ज्योतिषशास्त्राची मास्टर की कुणासाठी▪ 0 महेश देवशोध (राठोड )0

Summary

0 पोलीस योद्धा वृत्तसेवा 0 ० इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने ( IGNOU ) ज्योतिषशास्त्राची मास्टर पदवी देणारा एम ए ( MA ) अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे . त्यावरून सध्या वादंग सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहित अनेक विज्ञानवादी विचारांच्या […]

0 पोलीस योद्धा वृत्तसेवा 0

० इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने ( IGNOU ) ज्योतिषशास्त्राची मास्टर पदवी देणारा एम ए ( MA ) अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे . त्यावरून सध्या वादंग सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहित अनेक विज्ञानवादी विचारांच्या संघटनांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध सुरू केला आहे . हा अभ्यासक्रम भारतीय संविधानाच्या तत्त्वांना छेद देणारा व अवैज्ञानिक गोष्टीचे समर्थन करणारा असल्यामुळे तो ताबडतोब रद्द करावा अशी मागणी विज्ञान वादी विचारांच्या समर्थकांकडून होत आहे. सध्या संपूर्ण जगात विज्ञान क्रांती आणि परिवर्तन घडवून आणलेले असताना विद्यार्थ्यांना विनाकारण अशास्त्रीय व अंधश्रद्धा युक्त गोष्टी मध्ये गुंतवून ठेवण्याचा हा खोडसाळपणा आहे . असे शास्त्रज्ञांचे सुद्धा मत आहे .
त्यांना माहिती आहे खगोलशास्त्रामध्ये ग्रह-तार्‍यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. व त्याला विज्ञानाचा आधार आहे . संपूर्ण जगात खगोल शास्त्राला मान्यता आहे . असे असतांना सुद्धा खगोलशास्त्राला दुर्लक्षित करून ज्योतिषशास्त्राचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशाला पुन्हा पाषाण युगात नेण्याचा अट्टाहास आहे . तसेच ग्रहताऱ्यांचा मनुष्य जीवनावर कोणताच परिणाम होत नाही . हे शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे . त्यामुळे ग्रहताऱ्यांचा आधार घेऊन लोकांना भ्रमित करणारे फसविणारे व लुबाडणारे ज्योतिष हे शास्त्र म्हणजे विज्ञानाला सरळ सरळ आव्हान आहे . आमच्या अनेक संत महापुरुषांनी ज्योतिषांच्या भविष्यकथनावर आसूड ओढले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
० जोतिष्याशी देऊन घेऊन!! मनासारखे काढती गुण!! प्रसंगी नावही सांगती बदलून !! दंभ दारुण वाढला !!!
संत तुकोबा ही तेच सांगतात,
तुका म्हणे हरीच्या दासा !! शुभ काळ , अवघ्या दिशा !!!
गाडगे बाबा तर आपल्या कीर्तनातून अशा अवैज्ञानिक गोष्टीवर जबरदस्त प्रहार करायचे पंच्याग, ज्योतिषी , भटजी , अंधश्रद्धा , बुवाबाजी याविषयी लोकांना जागृत करून त्यांना या लबाड लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन करायचे म्हणूनच अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबाचे व नागपूर विद्यापीठाला तुकडोजी महाराजांचे नाव आहे . त्यामुळे विद्यापीठातून अशास्त्रीय गोष्टीचे शिक्षण देण्यामागे कोणता हेतू दडलेला आहे व त्यांना कशा प्रकारची पिढी निर्माण करायची आहे याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे .
आकाशातील ग्रह तारे पाहून ज्योतिषी , पंडित आपले भविष्य सांगतात सामान्य माणूस निराश , हताश , दुःखी आहे हे पाहून त्याला बरोबर हेरतात आणि त्याच्या दुर्बल मानसिकतेचा फायदा घेऊन त्याला खोटे भविष्य सांगतात. त्याच्या मुलां मुलींविषयी वाईट व भीतीदायक भविष्य कथन करून त्यांच्याकडून यज्ञयाग , व्रतवैकल्ये करवून घेतात . मंगळ , गुरू,शनी ची भीती दाखवून मोठमोठ्या पुजाअर्चा , अनुष्ठाने करायला लावून प्रचंड पैसे उकळतात . पंचांगाला समोर ठेवून ग्रह-तार्‍यांचा खेळ करून कुंडलीतील दोष दाखवून लग्न तुटण्याची, लग्नात काही तरी अनिष्ट घडण्याची, मोठे संकट येण्याची भीती दाखवून मोठ मोठ्या पदव्याही असलेल्यांना आपले शिकार बनवितात व पैसे दिले की सर्व संकटे दूर होतात . असा हा पंचांग व ज्योतिष यांचा खेळ आहे . त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमातून एक दैववादी, बेकार आणि अवैज्ञानिक पिढी निर्माण करण्याचा विद्यापी
ठाचा हेतू दिसून येतो . आधुनिक युगात ही गोष्ट विद्यार्थी , पालक व समस्त समाजाच्या दृष्टीने फार घातक व धोकादायक आहे .

त्यामुळे अहोरात्र विज्ञानाचा येथेच्छ उपभोग घेणार्‍या लोकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला पाहिजे कारण एकीकडे विज्ञान व दुसरीकडे अंधश्रद्धा हा विरोधाभास आहे . लोक वेगवेगळ्या ग्रहावर जाऊन आलेले असताना .कोट्यावधी मैलावरील हे ग्रह मनुष्याच्या जीवनात कसे काय? ढवळाढवळ करु शकतील हा विचार निदान सुशिक्षितांनी तरी करायला पाहिजे अन्यथा येणारी पिढी ही बुवा , बापू , ज्योतिष्यांच्या जाळ्यात सापडून आपल्या शिक्षणाचा व अवैज्ञानिक पद्धतीने गैरवापर केल्याशिवाय राहणार नाही असे वाटते .
समाजसुधारकांची तसेच पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख राहिली आहे. संत चक्रधर ते गाडगेबाबा यांच्या पर्यंत प्रबोधनाची दीर्घ परंपरा लाभली आहे . तर दुसऱ्या बाजूने परिवर्तनाची बिजे रोवणारे फुले, शाहू , आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक समाजसुधारक या ठिकाणी होऊन गेले . अशा भूमीत जोतिष्य शास्त्र या विषयात पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा विषय विज्ञान युगातील लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्याचा सारखा होणार आहे त्यामुळे हे षड्यंत्र थांबविण्यासाठी या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात येऊ नये.

० माजी संघटक ०
अखिल भारतीय अंधश्रद्धा
० ० निर्मूलन समिती ००

▪ पोलीस युद्ध वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड)▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *