सावनेर येथे रक्तदान शिबिर संपन्न
सावनेर :दिनांक :-१५ /१२/२०२० ला नेहरू युवा केंद्र नागपुर, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक नागपुर, तसेच तुषार दादा गायकवाड मित्रपरिवार सावनेर यांचे संयुक्त विद्यमानाने वार्ड क्रमांक एक पंचशील नगर, खापा रोड, सावनेर येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सावनेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष एडवोकेट श्री. अरविंद लोधी तथा प्रमुख पाहुणे म्हणून युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रफुल्लभाऊ कापसे उपस्थित होते.
या शिबिरासाठी युवा नेते तुषार दादा गायकवाड,मयूर ठाकरे, शुभम निकोसे, अविनाश नारनवरे,संजय मेंढे, विजय कांबळे, शुभम गजभिये, संकेत कुर्वे, योगेश गजभिये, पवन मालवी, शुभम गमे, लोकेश गायकवाड, सुरज ढोके व पंचशील नगर मित्र परिवार यांनी मेहनत घेतली.
या शिबिराला रक्तदात्यांच्या चांगला प्रतिसाद मिळाला एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी चे पथक आवश्यक साधन सामुग्रीने उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र, बॅग, चिक्की व चिवडा यांचे वाटप करण्यात आले.
विजय कांबळे
सावनेर शहर न्यूज रिपोर्टर
जिल्हा नागपूर