महाराष्ट्र

सरपंच सेवा संघाचा उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर. पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदुर्गांचा गौरव

Summary

अमरावती, दि. ७ : ग्रामविकासाची धुरा वाहणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. सरपंच सेवा महासंघ व सरपंच माझा […]

अमरावती, दि. ७ : ग्रामविकासाची धुरा वाहणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

सरपंच सेवा महासंघ व सरपंच माझा चॅनल नवदुर्गा उपक्रमाद्वारे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांना पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राहुल उके, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुकुंद पुनसे, गजानन देशमुख, ज्योतीताई अवघड, भारती मोहोकार, शिल्पा तायडे, सविता आहाके, अर्चना पखाले, नंदकुमार गोडगे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राजकीय, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनीही कधीतरी राजकारणापलीकडे जाऊन एकत्र येऊन काही उपक्रम राबवणे आवश्यक असते. त्यामुळे सरपंच सेवा संघ व सरपंच माझा  वाहिनीने एकत्र येऊन राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सरपंच महिलाभगिनींचा मानपत्र देऊन गौरव  करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *