*शिक्षक आमदार मा.विक्रम काळे यांचा डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या* *वतीने सत्कार* ……….
Summary
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदच्या वतीने विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचा वाटा असणारे विधान परिषद सदस्य, *मा.विक्रम काळे* यांचा शाल,ग्रंथव सन्मानपत्र देवुन दि.16 फेब्रुवारी 2021ला हॉटेल रेवती प्राइड येथे सत्कार करण्यात आला. सभेत शिक्षक आमदार मा. आमदार विक्रम काळे […]
- डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदच्या वतीने विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचा वाटा असणारे विधान परिषद सदस्य, *मा.विक्रम काळे* यांचा शाल,ग्रंथव सन्मानपत्र देवुन दि.16 फेब्रुवारी 2021ला हॉटेल रेवती प्राइड येथे सत्कार करण्यात आला. सभेत शिक्षक आमदार मा. आमदार विक्रम काळे यांचेसोबत संस्थापक अध्यक्ष मा. पप्पू पाटील भोयर, प्रदेश महासचिव सतीश काळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली यात जुनी पेन्शन योजना, राहिलेल्या खाजगी विनाअनदानित शाळांना अनुदान देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी समंधी शासनाची उदासीनता व आपला पाठपुरावा, तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या वरिष्ठ,निवड श्रेणी, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नती तसेच शाळाबाह्य कामाचा बोजा कमी करणे याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील प्रश्नांची उकल केली त्यात जुनीपेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक आहे तसेच आम्ही सर्व आमदार
त्याचा
पाठपुरावा करीत आहोत
त्याला यश मिळेल. राहिलेल्या
विनाअनदानित शालांकरिता एकही माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळा विनाअनुदानित
राहणार नाही असा
आमचा शासनस्तरावर प्रयत्न
सुरू आहे.विनाअनुदानित तुकड्यासमंधी सुद्धा असेच प्रयत्न सुरू आहेत व शासन सुद्धा त्याकरिता सहकार्य करीत आहे. यात काही संस्थेने अजूनही प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले नाहीत ही वस्तुस्थिती त्यांनी कथन केली. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड श्रेणी करिता येत्या १५ दिवसात १० दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण देवून लागू करण्यात येईल,त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित वरिष्ठ व निवड श्रेणी, पदवीधर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी,उपशिक्षणाधिकारी पदोन्नती संबंधी ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक काढण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील तसेच शाळाबाह्य कामे कमी करण्याबाबत शासनस्तरावर काम सुरू आहे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष (मा.) नितिन ठाकरे, सचिव प्रशांत जिंनेवार, जिल्हाध्यक्ष (प्रा.) सुनील मनवर, आशिष खडसे, दत्ता गावंडे,विनोद डाखोरे,देवदत्त भोयर, विजय ढाले, चंदू खोडके, मधुकर डहाके, अमोल गोपाळ, राजू गुघाणे,महादेव ढगे,बाबा डोळस,राजकुमार भोयर, अखलाक सर, रमेश पवार, उदार सर ,विजयराव कदम उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147