शासकीय जमा लेखांकन प्रणालीमध्ये लघुसंदेशाची सुविधा सुरु

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जमा लेखांकन प्रणाली (GRAS) मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी लघुसंदेशाची (SMS) सुविधा दि. 7 डिसेंबर 2020 रोजी सुरु करण्यात येत असल्याचे वित्त विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
यासाठी अदाकर्त्यांनी चलन तयार करताना अचूक मोबाईल नंबर नमूद करावा. जेणेकरुन अदाकर्त्यांच्या व्यवहाराचा जी.आर.एन. (GRN) त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल, असे आवाहन वित्त विभागामार्फत करण्यात आले.