मॉ साहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रीय युवा दिवस थाटात संपन्न.

नागपूर कन्हान : – मॉ साहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमासह साजरी करित राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला.
कन्हान-पिपरी नगरपरिषद च्या प्रांगणात मंगळवार दि.१२ जानेवारी ला दुपारी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते मॉ साहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादना सह राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मॉ साहेब राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच महिला सदस्या सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे हयांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर प्रकाश टाकीत उपस्थिताना मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित सर्व मंच पदाधिकारी, सदस्यानी राजमा ता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन थाटात साजरा करण्यात आला. याप्रसं गी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपा ध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, सतीश ऊके, प्रविण माने, अखिलेश मेश्राम, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे, वैशाली खंडार सह मंच पदाधिकारी आणि सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सचिव प्रदीप बावने यांनी केले तर आभार मंच सदस्य सतीश ऊके यांनी मानले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535