मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
Summary
नागपूर, दि. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री श्री.ठाकरे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय […]
नागपूर, दि. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री श्री.ठाकरे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना झाले.
तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे स्वागत केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलिपॅडवरून मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.
त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडीकडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद येथून विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.
विमानतळावरील मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491