BREAKING NEWS:
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणार

Summary

पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे विकसित करणाऱ्या स्टार( STARS) प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन , अध्ययन […]

पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे विकसित करणाऱ्या स्टार( STARS) प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे.
राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन , अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening, Teaching, Learning and Result for States – STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्रपुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सह, हिमाचल प्रदेश ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ अशा एकूण सहा राज्याचे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मधील कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.
या योजनेवर केंद्रशासन 60 टक्के व राज्यशासन 40 टक्के या प्रमाणात खर्च करेल. हा प्रकल्प पाच वर्षासाठी म्हणजेच 2020-21 ते2024 -25 या कालावधीसाठी असून यावर 976 . 39 कोटी एवढी रक्कम खर्ची घातल्या जाणार आहे. त्यापैकी केंद्रशासन शासनाकडून 585.83 कोटी तर राज्य शासनाकडून 390. 56 कोटी रुपयाची रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *