भालकेंच्या गाडी चालकाला लुटल्याप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात, अल्पवयीन दोघांचा समावेश
पंढरपूर: एका महिन्यांपूर्वी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कार गाडी चालकाला रस्त्यात अडवून तिघांनी लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
या लुटमार प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दि.10 डिसेंबर रोजी रात्री दिड च्या सुमारास दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कार गाडीचे चालक तुकाराम शिवाजी शिनगारे (वय 38) हे बडेवेचर झोपडपट्टी येथुन चालत घरी जात होते
यावेळी अज्ञात तिघांनी त्यांना अडवले . त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून मोबाईल आणि पैशाचे पाकीट काढुन घेतले व अंधाराचा फायदा घेऊन तिघेही पळुन गेले. यानंतर तुकाराम शिनगारे यांचा 24 हजारांचा मोबाईल आणि पाॅकिटमधील 3 हजार रुपये असा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दिली..
यानंतर पोलिस निरीक्षक अरुण पवार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख राजेंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश पवार यांनी तपास केला..
याप्रकरणी मनोज बाळू वाघमारे (वय 19 कलिकादेवी चौक पंढरपूर) व बत्तीस खोल्या पंढरपूर येथील येथील दोन अल्पवयीन दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे..
दरम्यान मनोज बाळू वाघमारे याला पंढरपूर येथील न्यायालयात हजर केले. असता एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली..
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क