नवीन ठाणेदारांना चोरट्यांची सलामी चोरट्यांनी विद्युत दुकान व दोन पानठेले फोडले
राजुरा – राजुरा येथे नवीन ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे यांनी कार्यभार हाती घेताच राजुरा-गडचांदूर मार्गावरील नाका क्रमांक तीन जवळील एक विद्युत सामानाचे दुकान व दोन पानठेले चोरट्यानी फोडले. यामुळे चोरट्यानीच नवीन ठाणेदार यांच्या आगमनातच त्यांना आव्हान दिल्याचे येथे बोलले जात आहे.
राजुरा शहरातील गडचांदूर रस्त्यावरील सुहास बोबडे यांच्या इलेक्ट्रिक स्टोअर्स येथे रात्री दुकानाचे कुलूप तोडून चोरी झाली. यात चोरांनी नगदी तीन हजार रुपयाची रक्कम, विद्युत मोटार वाईडिंग साठी लागणारे तांब्याचे तार व इतर सामानाची चोरी केली. या दुकानात तीस हजार रुपयांचा माल लंपास झाला. यासोबतच डॉ. चंद्रशेखर गोवारदीपे यांच्या दवाखान्या जवळील दोन पानठेले चोरट्यांनी फोडले, सुधीर मेश्राम यांच्या पानठेल्यातून तीन हजार रुपयांची चिल्लर एक बंद पडलेला मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे तर दुसऱ्या पानठेल्या मधून सामान नसल्याने फारसे काही त्यांच्या हाती लागले नाही. राजुरा-गडचांदूर हा राज्य महामार्ग असून नाका क्रमांक तीन जवळील ऐन चौकातील दुकाने चोरटय़ांनी फोडल्याने नवीन ठाणेदारांनी कार्यभार स्विकारताच त्यांना सलामी दिली आहे. या चोरीच्या प्रकरणाचा राजुरा पोलिस तपास करीत आहेत.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर