गोंडवाना यंग टीचर्स तर्फे शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार ऍड.अभिजित वंजारी यांना निवेदन*💐💐🌹🌹
Summary
चंद्रपूर- गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व प्राध्यापक वृंद,संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी,विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तथा विद्यार्थी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात आज पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ऍड.अभिजित वंजारी यांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले या […]
चंद्रपूर- गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व प्राध्यापक वृंद,संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी,विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तथा विद्यार्थी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात आज पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ऍड.अभिजित वंजारी यांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले या निवेदन अंतर्गत विविध मागण्या सोडविण्याच्या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार वंजारी यांची भेट घेऊन आपली भूमिका पटवून दिली आहे.या समस्यां आणि प्रलंबित प्रश्ना मध्ये कोरोना काळामध्ये परीक्षा न घेतलेल्या विद्यार्थ्यांची ती परत करणेअथवा पुढील परीक्षेमध्ये सदर फी समायोजित करणे , समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लावणे,2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कार्यान्वित करणे तसेच गोंडवाना विद्यापीठांमध्ये स्थायी स्वरूपात सहसंचालक उच्च शिक्षण यांचे कार्यालय स्थापन करणे व प्राध्यापकांना प्रमोशन अंतर्गत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने एकेडमिक स्टाफ कॉलेज ची निर्मिती करणे या मागणीसह अनेक शिक्षक,विद्यार्थी यांच्या प्रश्नाचा समावेश आहे. यासंदर्भात संघटनेचे सचिव प्रा. विवेक गोरलावर,उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते उपाध्यक्ष डॉ.राजू किरमिरे, सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने विभाग समन्वयक डॉ.किशोर कुडे,डॉ.अभय लाकडे,डॉ.संजय फुलझेले इत्यादी संघटनेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आमदार अभिजित वंजारी यांना आज निवेदन दिलेअसून आमदार ऍड.अभिजित वंजारी यांनी सर्व प्रलंबित प्रश्न व समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर