महाराष्ट्र

कामाची बातमी! मंगळवेढ्यात शिर्के हॉस्पिटल येथे आज बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर

Summary

मंगळवेढ्यात गुरुवारी नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी ‘सुवर्णप्राशन शिबीर’ ; फायदे वाचून थक्क व्हाल! मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी आज गुरुवार दि.28 जानेवारी रोजी धर्मगाव रोड येथील शिर्के हॉस्पिटल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 […]

मंगळवेढ्यात गुरुवारी नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी ‘सुवर्णप्राशन शिबीर’ ; फायदे वाचून थक्क व्हाल!

मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी आज गुरुवार दि.28 जानेवारी रोजी धर्मगाव रोड येथील शिर्के हॉस्पिटल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे

बुद्धीमत्ता,स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते.शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलां-मुलींची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?

बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वात योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितलेला आहे.

सुवर्णप्राशन वयोगट

नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला/मुलींसाठी तसेच शारीरिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक

शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप (बुन्द्रीवर्धक घृत) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?

शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे,जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल

आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

तर अधिक माहितीसाठी कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *