आरोग्य सेतू ऍप कोणी बनवला हे मोदी सरकारलाच माहिती नाही !!!
जग भरात कोरोना रुग्णाच्या ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग साठी अनेक विविध ऍप आले, तसेच भारत सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात आले की आरोग्य सेतू ऍप हा कोरोना रुग्णाच्या ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग साठी आहे यापासून संसर्ग रोकण्यासाठी मदत होईल.
काही काळ सरकारने तर हा ऍप सर्वांना बंधनकारक केला होता आणि नंतर अनेक जणांनी या ऍप च्या डाटा सेक्युरिटी विषयी प्रश्न विचारले मग सरकारने त्यावरील सक्ती उठवून सांगितले की या ऍप वर सक्ती नाही पण जर हा ऍप वापरला तर उपयोगी ठरेल.
पण आता या ऍप च्या निर्मात्यावषयी माहिती विचारण्यात आल्यावर तेव्हा त्याची माहिती सरकार कडेच नाहीये . हे अस का झालं याविषयी केंद्रीय माहिती आयोगाने सरकार ला नोटीस बजावली आहे.
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053