आप तर्फे विभागीय संचालक श्री रंगारी यांना वीज बिल माफी व कनेक्शन कट करू नये या संदर्भात निवेदन.
नागपूर आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ ला मा. विभागीय संचालक श्री रंगारी, महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा नागपूर विभाग, महाराष्ट्र राज्य, काटोल रोड़ येथे राज्यातील नागरिकांचे वीज कनेक्शन न कापणे, कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट विजबिल माफी, वाढीव वीज दर मागे घेणे व शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०% स्वस्त वीज देण्याबाबत आम आदमी पार्टी चे शिष्टमंडल डॉ देवेंद्र वानखड़े यांच्या नेतृत्वात भेटले.
निवेदन देतांना पक्ष पदाधिकाऱ्यांनी विभागीय संचालक याच्या सोबत चर्चा करतांना राज्य सरकार कडून विज तोड़न्याचे आदेश आलेत काय? सरकारी कार्यालय आणि आमदार, मंत्री यांच्या कड़े किती बाकी आहे? यांची यादि देण्याची विनती, केली, तसेच वरील समस्यांवर चर्चा केली.
त्यांच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले की दि. १ एप्रिल २०२० पासून वीजदर वाढ करून
जास्तीचे वीज देयके देण्यात आलीत, ती रद्द करून कोरोना काळातील चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफ करावे आणि शिवसेनेकडून जनतेला दिलेले वचन पाळावे याबाबत राज्यात अनेकदा आंदोलने करून निवेदन दिलेले आहेत. वेळोवेळी मंत्रिमंडळात चर्चाही झाली, तसेच याबाबत केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती मंत्री महोदयांनी मिडीयाला दिली, परंतु आज पर्यंत सरकार कडून याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनता निर्णयाची वाट पाहत आहे.
अशा संभ्रम परिस्थितीमध्ये अचानक दोन दिवसांपासून नागपूर मधील वीज
ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याचे कार्य आपल्या विभागातील अधिकारी
कर्मचारी करीत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहें. याबाबत शासनाकडून आपल्या विभागाला काही आदेश प्राप्त
झाले असल्यास त्याची प्रत देण्याबाबत विनंती करण्यात आली. तसेच राज्यातील विशेष करून नागपूर विभागातील कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापण्यात येवू नये, कारण राज्यातील जनता कोविड महामारी च्या आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. तसेच जोपर्यंत शासन स्तरावर काही निर्णय होत नाही तो पर्यंत चालू देयक भरण्याची विनंती करून नागरिकांचे कनेक्शन कापण्यात येवू नयेत, असे कळविण्यात आलें.
तसेच खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
१. कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करावी,
२. MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी,
३. शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे वचनपूर्ती करावी,
४. राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा,
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,
निवेदन देतांना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी श्री अशोक मिश्रा, जिल्हा संयोजक कविता सिंगल, आकाश सफेलकर, शंकर इंगोले, लक्ष्मीकांत दांडेकर, अलका पोपटकर, हरीश गुरुबक्षणि, सुरेंद्र समुन्द्र, इत्यादि अनेक कार्यकर्ता उपस्थित होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147