BREAKING NEWS:
महाराष्ट्र

अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी आज राहत पॅकेज जाहीर

Summary

मुंबई वार्ता:- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले: अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची […]

मुंबई वार्ता:- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत.
सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.
हे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी ₹ १०,००० कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
आज आम्ही ₹ १०,००० कोटी आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न राहील.
जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार आहोत.
फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल.
मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.

साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *