अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघाचे महराष्ट्राचे मुख्यमंत्री यांस निवेदन
चंद्रपूर 6 अॅक्टम्बर 2020
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश शाखा चे विद्यमाने महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, एस. बी.सी. सह ओ. बी. सी. प्रवर्गासाठी गठित केलेले महाज्योति या निधीचा अभाव आहे करिता विनियोग करणार कसे, विकास होणार कसे, या करीता श्री. आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचे नेतृत्वात दिनांक 6.10.20 ला एका शिष्टंडळाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मान. नाम. श्री. उद्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,तसेच मान.नाम. श्री. विजय वडेट्टीवार ,मदत व पुनर्वसन,तथा बहुजन विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना.विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र सरकार ला सादर करण्यात आले सदर निवेदनातून महाज्योति मध्ये विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील अशासकीय सदस्य नेमावें, विमुक्त भटक्या जमाती सह ओ. बी. सी. चे जन गणना केले पाहिजे, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजा सह ओबीसी वसतिगृह अनुदानात वाढ करावे, विमुक्त भटक्या समाजासाठी नॉन क्रिमी लेअर ची अट रद्द करावे/या संदर्भात उत्पन्न मर्यादा 15 लाख करावे, महाज्योति मार्फत समस्त विमुक्त भटक्या जमाती सह ओ. बी. सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यथा शीघ्र सुरू करावे. अशा विविध मागण्यांसह निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी शिष्ट मंडळात चंद्रशेखर कोटेवार, अशोक जाधव, रतन शिलावार अमित साळवे उपस्थित होते.
अमित साळवे
महाराष्ट्र प्रदेश सदस्य
तथा चंद्रपूर जिल्हा
संघटन प्रमुख.