मावळात घटस्थापना मोठ्या उत्साहात साजरी, एकविरा देवी मंदिरात घटस्थापना.
पत्रकार – सागर घोडके
पुणे मावळ
मावळ – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर नवरात्रोत्सवा निमित्ताने भाविकांसाठी खुले करण्यात आले. गेल्या दिड वर्षे मंदिर कोरोना काळात बंद करण्यात आले होते. आज मंदिर खुले करण्यात आले, त्यामुळे घटस्थापनेच्या व आरतीच्या वेळी भाविकांची गर्दी पाहण्यासाठी भेटली.
कार्ला गावचे सरपंच, उपसरपंच, पुजारी, गुरव, पोलीस पाटील , यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर घटस्थापना करण्यात आली, नंतर आरती करून नवरात्रीस सुरुवात झाली.
कोळी, आगरी, कुणबी समाजाची महाराष्ट्रातील भक्तांची, तसेच ठाकरे घराण्याची कुलदेत असणाऱ्या एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भक्त भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कोरोनाचा पाश्र्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन घटस्थापना करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात पोलीसाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.