नागपुर

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कन्हान ला थाटात साजरी. कन्हान शहर विकास मंच द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Summary

कन्हान : – शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान मंच पदाधिका-यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्पहार माल्यार्पण करून व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात […]

कन्हान : – शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान मंच पदाधिका-यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्पहार माल्यार्पण करून व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
रविवार (दि.१) ऑगस्ट २०२१ ला कन्हान शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त संताजी नगर कांद्री-कन्हान येथे अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेवर मंच नवनिर्वा चित सदस्य महेंन्द्र साबरे यांच्या हस्ते पुष्पहार माल्या र्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यकारी संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर व हरी ओम प्रकाश नारायण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

विदर्भ टेलर्स असोशियन कन्हान

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे परिसर कांद्री-कन्हान येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास विदर्भ टेलर्स असोशियन कन्हा न व्दारे माल्यार्पण व विनम्र अभिवादन करून अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.
रविवार (दि.१) ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता विदर्भ टेलर्स असोशियन कन्हान व्दारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे परिसर कांद्री-कन्हान येथील साहि त्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमजी रोडेकर, प्रमुख पाहुणे धर्मदास भिवगडे, विदर्भ टेलर्स असोशियनचे संस्थाप क अध्यक्ष नरेंद्र खडसे, प्रभाकर बावने आदीच्या हस्ते पुष्पहार, पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्या त आले. याप्रसंगी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अमुल्य कार्याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांना प्रसाद वितरण करून साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशश्वितेकरिता विदर्भ टेलर्स असोशियन कन्हान चे महासचिव कृष्णा ऊके, कल्लुजी नायक, पुंडलिक नागपुरे, सुरेश आंबिलढुके, विशाल वासनिक, राधेश्याम डोंगरे, प्रमोद इंगळे, श्रीमती भारती कांबळे आदीने परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कन्हान

रविवार (दि.१) ऑगस्ट ला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कन्हान व्दारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे परिसर कांद्री-कन्हान येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास रा. कॉ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, अशोक पाटील, राकॉ महिला तालुका अध्यक्ष दिप्ती समरित यांच्या हस्ते माल्यापर्ण व पुष्प अर्पित करून अभिवादन करून १०१ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अंबादास खंडारे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष मोरेश्वर खडसे, राकॉ कन्हान शहर सचिव नरेश सोनेकर, सुभाष बोरकर, नरेश हातागडे, अनिल भालेकर, अभिजित शेंडे, महेंद्र बर्वे, संजय मानकर, सुधाकर खडसे, खान मॅडम, वैशाली बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *