नागपुर

माजी मुख्यमंत्री व भाजपा चे राष्ट्रीय नेते देवेन्द्र फडवीस च्या जिल्ह्यात महाविकास आघाडी ची मुसांडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे अनुपस्थिती चा फटका रा का ला नागपुर जिल्ह्मयात महाविकास आघाडी अव्वल नंबर* ! *नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस निर्विवाद बहुमत सर्वांत मोठा पक्ष… भाजपा ला मोठा झटका चरणसिंह ठाकुर यांनी भा ज प जी बाजू राखली

Summary

काटोल-प्रतिनीधी नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी व पंचायत समितीच्या ३१ जागांच्या ओबीसी आरक्षणामुळे रद्ध झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागी विजय मिळविला. कॅबिनेटमंत्री सुनील केदार यांच्या प्रचाराच्या झंझावातामुळे त्यांनी विजयाचा गड राखला तर भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांचे गृह […]

काटोल-प्रतिनीधी
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी व पंचायत समितीच्या ३१ जागांच्या ओबीसी आरक्षणामुळे रद्ध झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागी विजय मिळविला. कॅबिनेटमंत्री सुनील केदार यांच्या प्रचाराच्या झंझावातामुळे त्यांनी विजयाचा गड राखला तर भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांचे गृह जिल्ह्यातच भा ज प ला जबर फटका प्रकर्षाने भाजपाला बसल्याची वस्तुस्थिती आहे.काटोल विधानसभा क्षेत्रा चे भा ज प नेते चरणसिंह ठाकुर यांचे नेतृत्वात काटोल(पारडसिंगा) नरखेड (सावरगाव) तालुक्यातून एक एक अश्या दो जागा भाजप ने पटकावल्याने भाजप ची थोडी बाजू सावसल्या गेली.
ही पोट निवडनूक काँग्रेसने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मंत्री केदार निवडणुकांच्या प्रचारापासून पायाला भिंगरी बांधल्यागत जिल्हाभरात फिरत होते. अनिल देशमुखांची अनुपस्थितीही त्यांनी भरून काढत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. ओबीसींच्या मुद्यांवरून सुरू झालेल्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्धा मात्र शेवटपर्यंत दिसला नाही. स्थानिक नेत्यांनी केलेला विकास, त्याचा मतदार संघातील राबता यावरूनच मतदारांनी त्यांना विजयाचा दावेदार बनविले. सर्वाधिक धक्का भाजपाला बसला. त्यांना विरोधी पक्ष नेते असलेला तगडा उमेदवार अनिल निधान यांची जागा गमवावी लागली. राष्ट्रवादीला दोन जागांचा फटका बसला. तर शेकापचे समीर उमप यांनी आपली जागा कायम राखली. पारडसिंगाची राष्ट्रवादीचे उमेदवार शारदा चंद्रशेखर कोल्हे यांची जागा भाजपाच्या मीनाक्षी संदीप सरोदे यांनी खेचून नेली. अनिल देशमुखांचा प्रचार व उपस्थिती या मतदारसंघात असती तर ही जागा राष्ट्रवादीला कायम राखता आली असती. भाजपाला ६ जागांवर विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपाचा कुठलाही बडा नेता प्रचारासाठी जिल्ह्यात न फिरकल्याने भाजपाचे यश हातचे गेल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत फडणवीस यांचे जातीने लक्ष विविध मतदार संघावर होते. दुपारी १२ वाजेपर्यंत महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषेदतील सहा विजयी उमेदवारांचे निकाल हाती आले होते. तोपर्यंत भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यांना खातेही उघडता आले नव्हते. नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ग्रामीण मतदारांनी भाजपाला नाकारल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.
———————-
-जिल्हा परिषद विजयी उमेदवार
हिंगणा (निलडोह ): संजय जगताप (काँग्रेस)
हिंगणा (डिगडोह ): रश्मी कोटगुले ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हिंगणा (इसासनी): अर्चना गिरी (भाजपा)
मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)
काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)
काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)
कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)
कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)
नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)
रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )
पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)
नरखेड (सावरगाव): पार्वता गुणवंत काळबांडे (भाजपा)
सावनेर (वाकोडी): ज्योती सिरसकर (काँग्रेस)
सावनेर (केळवद ): सुमित्रा मनोहर कुंभारे (काँग्रेस)
नरखेड (भिष्णूर): बाळू जोध ( राष्ट्रवादी काँग्रेस)
कुही (राजोला): अरुण हटवार (काँग्रेस)
——————
अध्यक्ष, उपाध्यक्षांचे ‘डॅमेज कंट्रोल’
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदार संघात तळ ठोकला होता. गावोंगाव त्यांनी पिंजून काढले. ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही आले. यासाठी कॅबिनेट मंत्री सुनील केदारांच्या सभांनी रंगत आणली. स्थानिक विकासाचे मुद्धे व भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे निवडणुका लादल्याचा त्यांनी केलेला प्रचाराचा मुद्धा मतदारांच्या चांगलाच पचनी पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *