नागपुर

नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित नाम मात्र दक्षता समिति व अधिका-यांमुळे नागरिकांचा खेळखंडोबा.

Summary

कन्हान : – तालुक्यातील नागरिकांचे शिधापत्रिका (राशन कार्ड) बनुन एक वर्षाचा कालावधी लोटुन लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. तसेच बंद असले ली अंतोदय राशन कार्ड योजना सुरू करून त्यांचे सुध्दा राशन कार्ड त्वरित बनवुन सर्व लाभार्थ्यांना सर कारी स्वस्त धान्याचा […]

कन्हान : – तालुक्यातील नागरिकांचे शिधापत्रिका (राशन कार्ड) बनुन एक वर्षाचा कालावधी लोटुन लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. तसेच बंद असले ली अंतोदय राशन कार्ड योजना सुरू करून त्यांचे सुध्दा राशन कार्ड त्वरित बनवुन सर्व लाभार्थ्यांना सर कारी स्वस्त धान्याचा लाभ देण्याची मागणी नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतृत्वात मा. नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गुरूवार (दि.९) ला नवोदय जनोत्थान संघटन कन्हान चे अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या नेतृत्वात पारशि वणी तहसिलदार यांना बंद असलेले सर्व शिधापत्रिका (राशन कार्ड) चालु करण्याकरिता निवेदन देऊन कोवि ड – १९ मध्ये हजारों लोकांचे राशन कार्ड बनविण्यात आले, परंतु एक वर्षाचा कालावधी लोटुण सुध्दा विभा गीय अधिका-यांच्या निद्रा अवस्थेमुळे राशन कार्ड लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. त्यांना धान्य कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. तसेच विधवा, विकलांग, कैन्सर, सिकलसेल आदी लोकां करिता सरकार ने अंतोदय राशन कार्ड योजना लागु केली असुन ती योजना बंद का ? या लाभार्थांचे अंतोदय राशन कार्ड कधी बनणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षता समितीचे गठन होऊन सहा महि न्याच्या वर झाले, आता पर्यंत दक्षता समिती ची एक ही सभा घेण्यात आली नसल्याने नागरिकांचे महत्वाचे विषय मांडणार कोणी कसे ? नाम मात्र दक्षता समिती व विभागीय अधिका-यांच्या निद्रा अवस्थेमुळे राशन कार्ड बनविणा-या लोकांचा खेळ खंडोबा होत. नागरि कांना खो- खो खेडाळु प्रमाणे कधी या टेबलावर, कधी त्या टेबलावर, कधी सात दिवसानी तर कधी पंधरा दिवसानी असे अर्जदाराला कमीत कमी चार वेळा तह सिल कार्यालयात सर्व काम धंदे सोडुन चकरा माराव्या लागतात. या सर्व विषयांवर चर्चा करून नवोदय जनो त्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतुत्वात शिष्टमंडळाने नायब तहसिलदार आडे साहेब यांना निवेदन देऊन बंद असलेल्या सर्व राशन कार्ड लाभा र्थ्यांचे राशन कार्ड चालु करून त्यांना सरकारी स्वस्त धान्याचा लाभ देण्याची मागणी निवेदन देऊन करण्या त आली. शिष्टमंडळात संघटन उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदिप बावने, अखिलेश मेश्राम, दिनेश नारनवरे, राजेश मेश्राम, सुदर्शन उके, प्रविण माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *