गडचिरोली

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रलंबित आधार प्रमाणिकरण व तक्रारीच्या पुर्ततेबाबत…

Summary

गडचिरोली, (जिमाका) दि.26 : महाराष्ट्र शासन, सहकार ,पणन, व वस्त्रोद्योगविभाग, शासननिर्णय दि.27/12/2019 नुसार दि.1/4/20215 ते 31/3/2019 या कालावधीमध्ये पीककर्ज घेतेलेल्या शेतक-यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली असून मा.प्रधानसचिव, (सहकार व पणन) सहकार ,पणन, […]

गडचिरोली, (जिमाका) दि.26 : महाराष्ट्र शासन, सहकार ,पणन, व वस्त्रोद्योगविभाग, शासननिर्णय दि.27/12/2019 नुसार दि.1/4/20215 ते 31/3/2019 या कालावधीमध्ये पीककर्ज घेतेलेल्या शेतक-यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली असून मा.प्रधानसचिव, (सहकार व पणन) सहकार ,पणन, व वस्त्रोद्योग विभाग,, मंत्रालय,मुबंई यांनी दि.14/10/2021 रोजी आढावा घेतला आहे.गडचिरोली जिल्हात दि.25/10/2021 अखेर पोर्टलवर 16425खाती अपलोड करण्यात आलेलीअसून विशीष्ट क्रमांकासह 15745 पात्र खाती प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी 15377 शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण झालेलेआहे. दि.25/10/2021 अखेर 15377 शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण झालेल्या पैकी 15012 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला असून त्यांचे खात्यावर 72.89 कोटी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.परंतु अद्यापही तालुकानिहाय आरमोरी – 33, गडचिरोली – 43, सिरोंचा – 29, अहेरी – 22, कुरखेडा – 42, कोरची – 1, धानोरा – 46,चामोर्शी-112,एटापल्ली-1,भामरागड-1,मुलचेरा-8,वडसादेसाईगंज-30 याप्रमाणे एकूण 368 खातेदाराचे आधार प्रमाणिकरण अद्यापही प्रलंबित आहे.

सदर योजना अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्यात असल्याने सदर योजना नजिकच्या काळात पुर्णत्वास नेणे आवश्यक असल्याने योजना अंमलबजावणी मधील प्रलंबित आधार प्रमाणिकरण व जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय समितीकडे असलेल्या तक्रारीचे निवारण या टप्यावरील कामकाज विशेष कालमर्यादित मोहिमेव्दारे पुर्णत्वास आणण्याच्या सुचना मा.प्रधानसचिव, (सहकार व पणन) सहकार ,पणन, व वस्त्रोद्योगविभाग,, मंत्रालय,मुबंई यांनी दि.14/10/2021 रोजी झालेल्या आढावा बैठकी मध्ये दिलेल्याआहेत.

याकरीता दि.15/10/2021 ते दि.15/11/2021 या कालवधीत प्रलंबित आधार प्रमाणिकरण तसेच प्रलंबित तक्रारीचे निराकरणासाठी जिल्हात विशेष मोहिम राबविण्यात येत असून आधार प्रमाणिकरण प्रलंबित असलेल्या शेतक-याच्या गावनिहाय याद्या बँकशाखा, विका/सेवा/आविका संस्थेच्या कार्यालयात तसेच संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणारआहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणिकरणासाठी अंतिम संधीआहे.या कालावधीत आधार प्रमाणिकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही यासाठी सर्व लाभार्थ्यानी आधार प्रमाणिकरणासोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारीच्या निवारणासाठी तालुका सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय, जिल्हा अग्रणीबँक, व्यवस्थापक, गडचिरोली, मुख्यकार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा मध्यवती सहकारी बँक लि.गडचिरोली तसेच आपले बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,गडचिरोली प्रशांत धोटे, यांनी केले आहे.

शेषराव येलेकर
विदर्भ चीफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *